गंगापूर मधील संभाजीनगर - वैजापूर रोडवरील पथदिवे कार्यान्वित

Foto
अनेक दिवसांपासून बंद होते पथदिवे

गंगापूर, (प्रतिनिधी): शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला व दैनंदिन सोयीसुविधांना प्राधान्य दिले आहे. नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर रोड ते वैजापूर रोड या शहरातील अनेक दिवसांपासून बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ बदलून नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत.
सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिक, वाहनचालक तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित विभागाला त्वरित निर्देश देऊन पाहणी करून घेतली व खराब स्ट्रीट लाईट बदलण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.

 या कामाअंतर्गत जुने व निकामी दिवे काढून त्यांच्या जागी उर्जासंवर्धन करणारे आधुनिक एलईडी
शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी व्यक्त केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिला, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ झाली आहे. 
स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर अधिक प्रकाशमान झाला असून नागरिकांनी समाधान आहे

नगरपरिषद गंगापूर शहर सुरक्षित, स्वच्छ व प्रकाशमान ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून येत्या काळात शहरातील इतर भागांतील बंद स्ट्रीट लाईटही दुरुस्त करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे, गंगापूर शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. येणाऱ्या काही दिवसांत शहरातील प्रत्येक प्रभागाची पाहणी करून ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. ते त्वरित दुरुस्त करण्यात येतील. तसेच ज्या ठिकाणी नवीन प्रकाशव्यवस्था आवश्यक आहे, त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने नवीन स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार आहेत. नागरिकांनी कोणतीही समस्या आढळल्यास नगरपरिषदेला कळवावी, त्वरित कार्यवाही केली जाईल. शहर पूर्णपणे प्रकाशमान करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- संजय जाधव, नगराध्यक्ष, गंगापूर